बाजार समिती शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांसाठी राबवित असलेल्या कार्याची प्रशंसा |
महेश साळुंके निफाङ तालुका प्रतिनिधी
लासलगा- येथील बाजार समितीस अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगथमु, उपमहाप्रबंधक व क्षेत्रीयप्रमुखआर. रवींद्र यांचे शिष्टमंडळाने भेट देऊन बाजार समितीच्या कामकाजाची माहिती घेतली.कांद्यासाठी आशिया खंडात प्रसिध्द असलेल्या लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये येणारी कांदा आवक व बाजारभाव, उघड व स्पर्धात्मक कांदा लिलाव प्रक्रिया, कांदा प्रतवारी व पॅकिंग सुविधा, देशांतर्गत व परदेशात होणारी कांदा निर्यात, कांदा निर्यात वाढीसाठी येणाऱ्या अडचणी व करावयाच्या उपाययोजना, कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, कांदा साठवणुकीसाठी अद्ययावत सुविधा, टिकवण क्षमता असलेल्या कांद्याच्या सुधारीत जाती, कांद्यापासुन तयार होणारे उपपदार्थ, कांद्यावरील विकिरण प्रक्रिया, कांदा निर्यात वाढीसाठी अपेडाच्या माध्यमातून बाजार समिती व निर्यातदारांसाठी असलेल्या विविध योजना, कांदा वाहतुकीसाठी रेल्वे, कंटेनर व जहाजांची सुविधा, भौगोलिक मानांकन मिळालेल्या लासलगावच्या कांद्याचा इतर देशांमध्ये प्रचार व प्रसार वाढीसाठी
लासलगाव । येथील बाजार समितीस अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगथमु, उपमहाप्रबंधक व क्षेत्रीयप्रमुख आर. रवींद्र यांचे शिष्टमंडळाने भेट देऊन बाजार समितीच्या कामकाजाची माहिती घेतली. कांद्यासाठी आशिया खंडात प्रसिध्द असलेल्या लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये येणारी कांदा आवक व बाजारभाव, उघड व स्पर्धात्मक कांदा लिलाव प्रक्रिया, कांदा प्रतवारी व पॅकिंग सुविधा, देशांतर्गत व परदेशात होणारी कांदा निर्यात, कांदा निर्यात वाढीसाठी येणाऱ्या अडचणी व करावयाच्या उपाययोजना, कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, कांदा साठवणुकीसाठी अद्ययावत सुविधा, टिकवण क्षमता असलेल्या कांद्याच्या सुधारीत जाती, कांद्यापासुन तयार होणारे उपपदार्थ, कांद्यावरील विकिरण प्रक्रिया, कांदा निर्यात वाढीसाठी अपेडाच्या माध्यमातून बाजार समिती व निर्यातदारांसाठी असलेल्या विविध योजना, कांदा वाहतुकीसाठी रेल्वे, कंटेनर व जहाजांची सुविधा, भौगोलिक मानांकन मिळालेल्या लासलगावच्या कांद्याचा इतर देशांमध्ये प्रचार व प्रसार वाढीसाठीकरावयाचे प्रयत्न इ. विषयांसंदर्भात प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ४) अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगथमु, उपमहाप्रबंधक व क्षेत्रीय प्रमुख आर रवींद्र, सहाय्यक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी, अभियंता हेमंत अत्तरदे यांनी बाजार समितीस भेट दिली. तसेच सदर शिष्टमंडळाने लासलगाव येथील भाभा अनुसंधान केंद्राच्या कृषक प्रकल्पास भेट देऊन तेथील विकिरण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.
सदर भेटीप्रसंगी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, सदस्य पंढरीनाथ थोरे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी बाजार समितीचे दैनंदीन कामकाज, सर्वशेतीमालाची लिलाव प्रक्रिया, वजनमाप, चुकवती, बाजार समितीने शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांसाठी आजवर राबविलेले उपक्रम, भविष्यातील योजना, कांद्याचे उत्पादन व साठवणुकीची व्यवस्था, कांदा आवक व बाजारभाव, भविष्यातील कांद्याची परिस्थिती इ. संदर्भात शिष्टमंडळातील प्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. यावेळी सभापती जगताप यांनी महिला उद्योजक व निर्यातदार यांचेसाठी अपेडामार्फत भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच बाजार समितीतील कांदा निर्यातदार नितीनकुमार जैन, ओमप्रकाशराका, मनोजकुमार जैन, एस. कार्तीकेयन, नविनकुमार सिंह, विकास सिंह, क्षितीज रेदासनी, यश राका यांनीव्यापारी वर्गास कांदा निर्यातीसाठी येणाऱ्या अडीअडचणी, कांदा निर्यातवाढीसाठी शासन स्तरावर करावयाच्या उपाययोजना, कांदा व इतर शेतीमालासाठी परिसरात पॅक हाऊस, मल्टीपरपज कोल्ड स्टोअरेज, ड्रायपोर्ट होणेसाठी
अपेडा मार्फत प्रयत्न करण्याची शिष्टमंडळास विनंती केली. याप्रसंगी अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगथमु, उपमहाप्रबंधक व क्षेत्रीय प्रमुख आर रविंद्र, सहाय्यक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांनी बाजार समिती शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांसाठी राबवित असलेल्या कार्याची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. भविष्यातील कांदा उत्पादन विचारात घेऊन भारतीय कांदा वेगवेगळ्या देशांना निर्यात करणेसाठी अपेडाच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येतील. तसेच भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने बाजार समिती व कांदा निर्यातदारांकडुन सविस्तर प्रकल्प अहवाल अपेडास सादर झाल्यास त्यावर सकारात्मक विचार करून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बाजार समितीतर्फे अपेडा पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.