Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पिक अपने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        वैजापूर-भरधाव वेगाने जाणाऱ्या पिक अपने  धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला.ही घटना खंडाळा वैजापूर रस्त्यावर रोटेगाव शिवारात गुरूवारी रात्री घडली.जनार्धन विश्वनाथ तिवारी (५५) रा.जयभवानीनगर आघूर असे या अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे.ते प्रशांत बोथरा यांच्या कडे वाॅचमन म्हणून काम करत होते.तिवारी रात्री कामावरून घरी जेवण करण्यासाठी पायी जात होते.त्यावेळी खंडाळ्याकडून वैजापूर कडे जाणाऱ्या पिक अपने (एम एच १७ बी वाय ३५८७) त्यांना जोराची धडक दिली.या अपघातात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला.मात्र प्रशांत बोथरा,केतन आव्हाळे व निलेश आव्हाळे यांनी दुसऱ्या वाहनाने पाठलाग करून वाहन चालकास वैजापूर शहरात पकडले.त्यानंतर पोलीसांच्या स्वाधीन केले.या प्रकरणी प्रशांत बोथरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक मोहसीन जमशेर मनीयार रा.सुभाष नगर ता.कोपरगाव या चालकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.