राज्यस्तरीय आयोजित निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, यशोमती ठाकूर, ज्योती ठाकरे यांच्याहस्ते संजय गायकवाड यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर :राज्यस्तरीय आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत महिला अर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांना उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याहस्ते मुंबई येथे गौरविण्यात आले.
मराठी राजभाषा दिदिनानिमित्त महिला अर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या विशेष पुढाकाराने महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी 'माझ्या मते मैत्री म्हणजे' या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. याबद्दल मुंबई येथील चर्चगेट परिसरातील वालचंद हिराचंद हाॅल इंडियन मर्चंट चेंबरमध्ये उद्योग व खनिकर्म ( मराठी भाषा ) मंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ आदींच्या प्रमुख उपस्थितीत संजय गायकवाड यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.