वैजापूर-एका अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील महालगाव येथे उघडकीस आली.या प्रकरणी एका युवकाविरूद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.अभिषेक तात्यासाहेब सोमवते (१८ ) असे आरोपीचे नाव आहे. सोमवते याने सतत चार महिन्यांपासून सदर मुलीवर अत्याचार केला . तिच्या पोटात दुखत असल्यामुळे तिच्या आजीने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.तेव्हा ती गर्भवती असल्याचे समोर आले.
सदर १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी महालगाव येथे आपल्या आजीकडे राहते.चार महीन्यापुर्वी ती सरपण आणण्यासाठी शेतात गेली होती.त्यावेळी सोमवते हा मोटारसायकल वर तिच्या पाठीमागे गेला.त्याने तिला बळजबरीने ऊसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून तिच्या वर बलात्कार केला.तसेच कुणाला ही घटना सांगीतल्यास चाकूने तुझे व कुटुंबियांचे तुकडे करील.अशी धमकी दिली.त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कुणाला काही सांगीतले नाही.त्यानंतर सतत तिला धाक दाखवून तसेच लग्नाचे आमीष दाखवून शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.तिच्या पोटात दुखायला लागल्यावर नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आला.या प्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक सोमवते याच्याविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात बलात्कार व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती हे करीत आहेत.