प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- तालुक्यातील खंडाळा येथील एक विवाहीत महीला १५ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. कविता विलास आव्हाड (२२)असे बेपत्ता महीलेचे नाव आहे. कविता ही माहेरी खंडाळा येथे राहत होती.२५ फेब्रुवारी पासून ती बेपत्ता झाली आहे.नातेवाईकाकडे तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.तिचे वडील जगन्नाथ कारभारी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कविता बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.