प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर. कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात देशभरातील सर्व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी आयटकच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या दोनशेवर अंगणवाडी सेविकांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. युनियनचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड राम बाहेती व राज्य परिषदेच्या सदस्या तथा वैजापूर तालुकाध्यक्ष कॉम्रेड शालिनी पगारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले
२०२२-२३ च्या अर्थसंकल्पात सरकारने अंगणवाडी सेविकांच्या तोंडाला पाने पुसली. कोविड सर्वेक्षणाच्या कामापासून इतर शासनाच्या कुठल्याही योजनेची अंमलबजावणी करण्याआधी अंगणवाडी सेविकावर कामे थोपवली जातात. जेव्हा त्यांच्या मानधन वाढीचा प्रश्न येतो तेव्हा ह्याच अंगणवाडी सेविकांचा त्यांना विसर पडतो याच उद्देशाने अंगणवाडी सेविकांच्या राज्य व स्थानिक स्तरीय मागण्यांसाठी सर्व अंगणवाड्या २८ व २९ मार्च रोजी अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात येऊन दोन दिवसीय संप पुकारण्यात आला. पंचायत समिती सभागृहात मेळावा घेण्यात येऊन दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येउन आयटक जिंदाबाज, आवाज दो, हम एक है....हमारी मांगे पुरी करो वरना कुर्सी खाली करो अशा विविध घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी स्वीकारले.
आंदोलनात शबाना शेख, पंचशीला धनेश्वर, शोभा तांदळे, सोनी चव्हाण, मीना पवार, शैला बोऱ्हाडे, संजीवनी पांडागळे रंजना माळी,निर्मला बोरगे,विद्या गायकवाड,मनीषा बागुल,शशिकला तांबे,प्रविणा शिंदे,मंदाकिनी जाधव,अनिता शिंदे,शालिनी घोगरे,सुनीता भागवत,ज्योती पवार,सत्यशीला चव्हाण,अनुसया घोडेराव,उज्ज्वला निकम,ताई हारदे,रत्नाबाई क्षीरसागर,बीजला काळे आदीसह शिऊर, खंडाळा, मनूर, लोणी खुर्द, महालगाव,लाड गाव,वैजापूर शहरी विभागातील शेकडो कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. फोटो सह