प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर. घरात कुणी नसल्याची संधी साधुन चोरांनी घरफोडी करुन पेटीतील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, बॅकेचे पासबुक, चेकबुक व वाहनांची कागदपत्रे असा एकुण ७८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.ही घटना सोमवारी रात्री खंडाळा (ता. वैजापूर) येथे घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग गांगुले (७४) हे कुटुंबियांसह खंडाळा येथे राहतात. त्यांची तीन मुले कुटुंबियांसह बाहेरगावी राहत असुन त्यांचे संसारोपयोगी सामान खंडाळा येथील घरात आहे. सोमवारी प्रेमिका गांगुले हे नातीला घेऊन शेजारच्या लग्नाला गेले होते. तर त्यांच्या पत्नी या आठ दिवसांपुर्वी नाशिकला गेल्या होत्या. त्यामुळे घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराला दरवाजा नसल्याने लावलेला पत्रा बाजुला करुन घरात प्रवेश केला व घरतील पेटीची कडी तोडुन पेटीतील सोन्याची अंगठी, कानातील टापसे, नेकलेस, १८ हजार रुपये रोख, बॅकेचे पासबुक, चेकबुक व ट्रॅक्टर,पोकलॅन मशीन व दुचाकीची कागदपत्र असा ७८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी गांगुले यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.