वैजापूर तालुक्यात मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील महालगाव, नागमठाण मंडळासह अन्य मंडळातही कमी जास्त प्रमाणात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने काढणीला आलेला गहु, हरभरा, उन्हाळी कांदा या पिकांना काही प्रमाणात फटका बसला. असे असले तरी पावसाची तीव्रता कमी असल्याने पिकांना बाधा पोहचली नसुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी महालगाव, नागमठाण एकोडीसागज, नांदुरढोक या भागात किरकोळ पाऊस झाला. मात्र या पावसाने पिकांचे फारसे नुकसान झाले नाही अशी माहिती कृषि विभागातर्फे देण्यात आली.