Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महिला तक्रार प्रकरणातील पोलिसांचा हलगर्जीपणा अक्षम्य - आतिशभाई खराटे

 


मलकापूर

        मलकापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेल्या महिला तक्रार प्रकरणात गेल्या तीन महिन्यापासून कारवाई न करता महिलांच्या तक्रारदारांना मानसिक त्रास देऊन पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तपास अधिकारी संजय महाजन यांच्यावर कामत कसूर करण्याची कारवाई करून त्यांना नोकरीवरून त्वरित निलंबित करण्यात यावे या आशयाचे निवेदन  आतिश भाई खराटे महासचिव वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा यांच्या नेतृत्वात मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मा. उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत देण्यात आले

             महिलांच्या सुरक्षितते बाबत जागरूक राहण्याचे सर्व शासकीय विभागांकडून आवाहन केले जाते मात्र मलकापूर पोलीस स्टेशन मध्ये मात्र महिलांनी दिलेल्या तक्रारीवर तीन-तीन महिने कारवाई होत नसून महिलांच्या तक्रारींना एक प्रकारे केराची टोपली दाखवल्याचे प्रकार मलकापूर पोलीस स्टेशन मधील कार्यरत तपास अधिकारी संजय अनंतराव महाजन यांनी केल्याने तसेच वारंवार त्यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे तक्रारी संदर्भात चौकशी केली असता नेहमी उडवाउडवीची उत्तरे व इतर कामे असल्याचे सांगत जवळपास तीन महिन्यापासून महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता केवळ आरोपींना सहकार्य केल्याचे निदर्शनास येते सदर नेमलेले तपास अधिकारी यांना कोणते प्रकारचे तंत्रज्ञानाची माहिती नसताना त्यांच्याकडे तपास देऊन महिलांची खिल्ली उडविण्याचा प्रकार मलकापूर पोलीस स्टेशन ने केला असल्याचे विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. 

        पोलिसांकडून मिळणाऱ्या अशा वागणुकीमुळे तसेच आरोपींना पाठीशी घालण्याचा वृत्तीमुळे महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा अस्तित्वात आला असताना त्याची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी  होताना दिसत नाही फोन द्वारे धमकी व शिवीगाळ करणाऱ्या आरोपींशी संगनमत करून आरोपींना अभय देण्याचे काम करणाऱ्या पोलीस तपास अधिकारी संजय महाजन यांच्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होत असून जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास कायम राखण्यासाठी संजय महाजन यांना सदर प्रकरणात भ्रष्टाचाराच्या व कर्तुत्व कसूर करण्याच्या आरोपाखाली कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केलेली असून येत्या आठ दिवसात सदर संजय महाजन यांच्यावर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला 

             सदर निवेदनदेते वेळी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, ता.उपाध्यक्ष गजानन झनके,विलास तायडे,सुपडा ब्राम्हणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


    मलकापूर पोलीस स्टेशन मधील महिलांच्या तक्रारी प्रकरणातील हलगर्जीपणा हा अक्षम्य असून यापूर्वीही मलकापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या मागासवर्गीय महिलांच्या तक्रार प्रकरणात पोलिसांची भूमिका विश्वासार्ह म्हणता येण्यासारखी नाही . पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून महिला जर पोलीस स्टेशन मध्ये येत असतील तर त्यांना न्याय मिळवून न देता उलट मानसिक त्रास देणे ही बाब पोलीस खात्याच्या प्रतिमेसाठी योग्य नाही . यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसात चांगली राहण्यासाठी अशा गैर जवाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.  -आतिश भाई खराटे महासचिव वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा