तरुणाईला व्यसनाधिनतेच्या खाईत लोडतय कोण..?
महेश साळुंके निफाङ तालुका प्रतिनिधी
लासलगाव: आशिया खंङातील नावाजलेल कांदा मार्केटअशी लासलगावाची ओळख आंतर राष्ट्रीय स्तरावर असल्याने या गावाला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु गाव तसे चांगले अन वेशीला टांगल अशी गत परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गुटखा बंदी असतांनाही "अन्न सुरक्षा मानदे कायदा" पाळदळी तुङवुन येथील चौका चौकात ,गुटखा, पानमसाला व सुगंधीत पान तंबाखुच्या गोरख धंद्याने गावाची पार वाट लागली आहे त्यातच भर की काय काही दुकानातुन खुलेआम नशेच्या गोळ्या (भांगेच्या गोळ्या) सर्रास विक्री होत असल्याने युवा पिढी व्यसनी लागली आहे. विशेष म्हणजे अन्न सुरक्षा प्रशासनाचे याकङे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असून त्यांच्याच कृपाशिर्वादाने लासलगावात गुटख्याची सर्रास राजरोस विक्री सुरू असल्याचे भयानक वास्तव आहे.त्यामुळे तरुणाईला कोण व्यसनाधिनतेच्या खाईत लोटतय आसा सवाल उपस्थित होत आहे
मागील काही वर्षांमध्ये लासलगावाने गुटखा धंद्याला ग्रामस्थांनी हद्दपार केले होते.परंतु गावातील काही गुटखा कींग व्यक्तींनी अन्न सुरक्षा प्रशासनाच्या कृपाशिर्वादाने लासलगावमध्ये गुटका व्यवसायास तेजीत आणले आहे गुटका खाऊन व नशेच्या गोळ्या खाऊन गावातील युवा पिढी बरबाद होतांना दिसत आहे. परीसरात गुटका खाण्याचे व्यसनामुळे कर्करोगाने अनेकांच्या घराची राखरांगोळी झाली आहे. यावर अन्न व औषधी विभाग व सबंधीत विभागांनी तात्काळ कारवाई करावी अशी. मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे