वैजापूर
वैजापूर येथील न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विविध विभागांची एकूण पाच हजार ७८४ ठेवण्यात आली होती त्यापैकी ५१९ प्रकरणात तडजोड होऊन निकाली काढण्यात आली. तसेच सोळा कोटी ६६ लाख ८७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. जिल्हा अप्पर न्यायाधीश एम.मोहियोदीन एम.ए. यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून लोक अदालतचे उदघाटन झाले.न्यायाधीश डी.एम.आहेर, न्यायाधीश पी.पी.मुळे. न्यायाधीश श्रीमती आर.एन.मर्क, न्यायाधीश एस.आर.शिंदे, न्यायाधीश श्रीमती पी.टी. शेजवळ, न्यायाधीश एस.एस.निचळ, न्यायाधीश श्रीमती पी.आर.दांडेकर, न्यायाधीश वाय.जे.तांबोळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये कोर्टातील दोन हजार ८१५ प्रकरणे व वादपूर्व दोन हजार ९६७ अशी पाच हजार ७८४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी कोर्टातील २६० व वादपूर्व २५९ अशा एकूण ५१९ प्रकरणात तडजोड होऊन ती निकाली काढण्यात आली. कोर्टातील प्रकरणात १४ कोटी ८८ लाख ४२ हजार ५७८ रुपये व वादपूर्व प्रकरणात एक कोटी ७८ लाख ४४ हजार ९७१ रुपये अशी एकूण १६ कोटी ६६ लाख ८७ हजार ७२९ रुपयांची वसुली करण्यात आली.विधीज्ञ मजहर बेग,संदीप कटारे,शरद हारदे, प्रफुल्ल पोंदे, आकाश ठोले,प्रदीप चंदने, रविंद्र मिसाळ,रईस शेख, पांडुरंग पवार,राहुल धनाड, ज्योती शिंदे, कुणाल हरिदास,माया जाधव,अशोक सोनवणे यांनी पंच म्हणून काम पाहिले. वकील संघाचे अध्यक्ष किरणकुमार त्रिभुवन, उपाध्यक्ष व्ही.जी.वाघ, सचीव वैभव ढगे, कोषाध्यक्ष नितीन बोराडे, सरकारी अभियोक्ता नानासाहेब जगताप, इम्रान खान, अनिल रोठे, राफे हसन, डी.एन.जाधव, संजय बत्तीसे, रमेश सावंत, एकनाथ कुंजीर, सचिन दहिभाते,कृष्णा गंडे, जे.डी.हरिदास, देवदत्त पवार आदींनी परिश्रम घेतले.