प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- तालुक्यातील सावखेडगंगा येथे रविवारी पहाटे बिबटयाने मोटार सायकल वरून जाणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला.दोघेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत.शुभम अशोक खटाणे (२७) अरूण व्हसाळे दोघेही रा.सावखेडगंगा हे दोघे जखमी झाले.खटाणे यांच्या वर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अरूण व्हसाळे व शुभम खटाणे हे दोघे वेगवेगळ्या वेळेत शेतात पाणी भरण्यासाठी मोटारसायकल वर पहाटे जात होते.त्यावेळी दोघांवरही बिबट्याने हल्ला केला.
काही दिवसांपासून या परीसरात बिबट्याचे वास्तव्य आहे.ऊसाचे तोड सुरू असल्याने शेत रिकामी होत आहेत.त्यामुळे बिबट्यांची वास्तव्य उघडी पडली आहे.कापूसवाडगाव,फकीराबादवाडी येथेही बिबट्याने हल्ले केल्याची घटना घडली आहे.घटनेची माहीती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवडे,वनाधिकारी कवठे यांनी गावात जाऊन पाहणी केली.तसेच नागरीकांची बैठक घेऊन बिबट्या दिसल्यास घाबरून न जाता पोलीस किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.