प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
शहरातील लाडगाव रोड भागात निवारानगरी येथे निवृत्त पोलिस निरीक्षकांचे घर फोडून तीस हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. याच भागातील अन्य एक घर फोडून चोरांनी सोन्याचे मणी मंगळसुत्र, चांदीचे डुल, चांदीची चैन व एटीएम कार्ड असा ३१ हजार रुपये किमतीचा ऐवज पळवला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. निवारानगरी भागात केंद्रिय राखीव पोलिस दलातुन सेवानिवृत्त झालेले पोलिस निरीक्षक सोपान देवकर हे पत्नीसह राहतात. याच गल्लीत संतोष भालेराव हे देखील राहतात.
सोपान देवकर हे पत्नीसह पुण्याला मुलांकडे गेले होते. चोरांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोंडुन कुलुप लावुन ठेवलेली दुचाकी चोरली. तसेच संतोष भालेराव यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून सोन्या चांदीचे दागिने व बॅकेचे एटीएम कार्ड चोरुन नेले अशी तक्रार देवकर यांनी पोलिसांत दिली. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.