महावितरणच्या वैजापूर शहर शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात संप पुकारल्याने कार्यालयात सोमवारी शुकशुकाट |
प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर विविध मागयांसाठी तहसिल कार्यालयातील महसुल विभाग, महावितरण व बॅक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामकाजावर परिणाम झाला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. महसुल विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, नायब तहसिलदराची पदे मंडळ अधिकारी संवर्गातुन भरावीत या मागणीसाठी महसुल कर्मचारी संघटनेतर्फे मागील दोन दिवसांपासुन राज्यव्यापु संप पुकारण्यात आला आहे. या संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने सोमवारीही महसुल कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.
काही बॅकांनीही संपाचे हत्यार उगारल्याने आर्थिक व्यवहार करण्यासाठी बॅकेत आलेल्या ग्राहकांची सोमवारी चांगलीच तारांबळ झाल्याचे बघायला मिळाले. दुसरीकडे, शासनाने महावितरण कंपनी, जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांनी चालवण्याचा घाट घातल्याने महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने खासगीकरणाला विरोध दर्शवत मध्यरात्रीपासुन संप करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणच्या वैजापूर शहर विभागातील सात अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान महावितरणच्या अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग घेतल्याने येथील कामकाज जवळपास ठप्प झाले होते.