Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकास ताब्यात

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

    वैजापूर- तालुक्यातील अगरसायगाव येथील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.मात्र सदर अल्पवयीन मुलीस एक मुलगा झाल्याचे उघडकीस आले.नवनाथ बाळू बर्डे (२१) रा.नेवासा असे आरोपीचे नाव आहे.

    सदर  मुलगी ही अगरसायगाव येथील रहिवासी आहे.ती मामाच्या घरी राहत असताना तिचे एका मुलाशी प्रेमविवाह जुळला.त्यांनी घरात कुणाला काही एक न सांगता ते १७ फेब्रुवारी २०२२ रोजी घरातून निघून गेले.त्यामुळे नातेवाईकांनी वैजापूर सदर १७ वर्षीय मुलीस फुस लावून पळवून नेले.म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी पोलिसांनी तपास करून घुमानदेव ता.श्रीरामपूर येथून दोघांनाही ताब्यात घेतले.त्यावेळी सदर मुलीस मुलगा झाल्याचे पोलीसांना आढळून आले.नवनाथ बर्डे यांस येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.तर सदर मुलीस बाल कल्याण समिती समोर हजर करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.अधिक तपास फौजदार श्रीराम काळे हे करीत आहेत.