वैजापूर- येथील सेंट मोनीका इंग्लीश स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमीत्ताने शाळेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात पालक महीलांनी बहारदार नृत्य सादर केली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेची इमारत , प्रवेश द्वार व प्रांगणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच रांगोळी द्वारे महिला दिनाचा संदेश देण्यात आला.शाळेच्या सचिव शिल्पा परदेशी यांच्या विनंतीवरून महिला शिक्षकांनी गुलाबी साडी व महिला पालकांनी हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती.तसेच महिलांना सेल्फी काढण्यासाठी सुंदर अशी बाहुली उभारण्यात आली होती.ती सर्वांचे आकर्षण ठरली.
यावेळी सेंट मोनीका इंटरनॅशनल स्कुलच्या सीबीएसई इमारतीच्या संकल्प चित्रांचे अनावरण शिल्पा परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिना जाधव यांनी केले.सुत्रसंचालन शिल्पा परदेशी यांनी केले.स्वागत गीत गायीका फरीन शेख यांनी गायले.तर स्वाती खैरनार यांनी आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किशोर सांळुके, अमोल धामणे,राहुल नवले,विजय डांगे,अजय क्षीरसागर,आकांक्षा सोमाणी,प्रांजल कोठारी,प्रतीक्षा दाढे यांनी परीश्रम घेतले.