Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय गुरुकुल महालगाव येथे अपुर्व विज्ञान मेळावा मोठ्या उत्साहात साजरा

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


वैजापूर-राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तालुक्यातील श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय गुरुकुल महालगाव  येथे अपुर्व विज्ञान मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण वातावरण विज्ञानमय झाले होते.सदर मेळाव्यासाठी प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट बनवण्यात आले होते. माध्यमिक गटातून एकूण 31 प्रयोग व प्राथमिक गटातून एकूण 29 प्रयोग प्रदर्शनासाठी ठेवले गेले होते .तसेच विज्ञान रांगोळ्या मध्ये एकूण 20 रांगोळ्या इ.10 च्या विद्यार्थिनींनी सादर केल्या.अशा प्रकारे एकूण 80 प्रात्यक्षिके विदयार्थ्यांमार्फत सादर करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी अपूर्व विज्ञान मेळावा समिती स्थापन करण्यात आली होती .

    समितीमधील  रामटेके एन. एम ,  मोरे पी .पी व खिल्लारे के.पी यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून मेळावा यशस्वी केला. तसेच सर्व प्रयोग व प्रात्यक्षिके यांचे परीक्षण केले. माध्यमिक गटातून प्रथम - इ व्हि प्रोजेक्ट    द्वितीय - ॲटो लाईट   तृतीय - फ्लोटींग हाऊस  प्राथमिक गटातून प्रथम - हार्डवेअर सेन्टर   द्वितीय - सेन्सर गुगल   तृतीय- सूर्यमाला  यांनी क्रमांक पटकावले.सदर कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी पालकांना निमंत्रण देण्यात आले होते.बहुसंख्य पालक ही यावेळी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थीनींनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सरपंच  भाऊसाहेब  झिंजुर्डे हे होते. उदघाटन  केंद्रप्रमुख  बी.के म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.  मुख्याध्यापक  जगताप , रजनीकांत नजन , अमोल गलांडे ,  रामेश्वर पाटोळे आदींची उपस्थिती होती.सदरील कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे मुख्याध्यापक  ढोबळे डी.एस यांनी केले.सुत्रसंचलन  क्षिरसागर डी. बी व आभार प्रदर्शन  कुभांडे के .एन यांनी केले.तसेच  निकम एम. आर,  भंडारे ए .डी ,  वाघ एन. के,चौधरी बी.एम आणि सेवक  माळी आर.एम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले