प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नालेगाव येथील भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य बी. एम. हजारे , कृषी अधिकारी एच. आर. बोयनर , सरपंच वेणूनाथ बागुल , प्रा.भरत निंबाळकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
केंद्र संयोजक प्रा. प्रमोद एन. पठारे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतांना आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणितील योगदान विसरता येणार नाही. असे आपले विचार मांडले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य बी. एम. हजारे यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्याचा आढावा घे्तांना त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान महत्वपूर्णआहे असे आपले मत व्यक्त केले