चार विरोधात पाच अशा एक मताच्या फरकाने विजय |
प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- तालुक्यातील लोणी खुर्द येथील उपसरपंच पदाच्या लढतीत भाऊसाहेब जाधव यांचा पराभव करत गजाला अरिफ सय्यद यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. आप्पासाहेब जाधव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसापासून लोणी खुर्द येथील उपसरपंच पद रिक्त होते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय लोणी खुर्द येथे उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत गजाला सय्यद यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. चार विरोधात पाच अशा एक मताच्या फरकाने हा विजय मिळाला आहे.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एल. पी. जयसिंगपूरे, तलाठी राहुल लखवाल व ग्रामविकास अधिकारी एस. आर.दिवटे यांनी निवडणूकीचे काम पार पाडले.या विजयामुळे गजला सय्यद यांचे भिकन सोमासे,रिखब पाटणी,उत्तमराव निकम, राउफ दादा सय्यद,सचिन कुमावत,राधाकृष्ण सोनवणे, आप्पासाहेब जाधव,, उत्तमराव जाधव, मदनराव जाधव, काशिनाथ सोनवणे, पंढरीनाथ पवार, सोपान जाधव, निजाम सय्यद,खाजू सय्यद,दादाभाई सय्यद,एन. डी .पाटील, अनिल पवार, प्रदीप जाधव, राजेंद्र बागुल, राहुल पवार,दीपक बागुल,जमादार सय्यद,हसन सय्यद,तैमूर सय्यद यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.