प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- तालुक्यातील तलवाडा शिवारातील घाटात एका अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शुक्रवारी सायंकाळी मिळून आला.गुरे चालणाऱ्या इसमांना हा मृतदेह आढळला.घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश केळे, अविनाश भास्कर आदींनी घटनास्थळी भेट दिली.रात्री उशीरा पर्यंत पंचनामा सुरू होता.सदर इसमाची ओळख पटलेली नाही.मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून अंदाजे वय ४० वर्षे दिसून येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.पाय घसरून हा इसम दरीत पडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.