प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्यात एक मजूर वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.सदर मजूराचा मृतदेह अद्याप सापडला नाही.सोहेल पठाण (१९) रा.कान्हेगाव ता.श्रीरामपूर असे या मजूर युवकाचे नाव आहे.तो खतांच्या ट्रक्टर वर मजूर म्हणून काम करतो.रोठी वस्तीजवळ शेणखत खाली केल्यानंतर दोघे यूवक मजूर हातपाय धुण्यासाठी कालव्याजवळ गेले .त्यावेळी सोहेल हा पाय घसरून पाण्यात पडला.तसेच दुसरा एक जण बचावला.सोहेल याचा मृतदेह अद्याप मिळून आला नाही.वैजापूर पोलीस ठाण्याचे हवालदार किसन गवळी व अग्नीशमन दलाच्या पथकाने कालव्यात जवळपास १२ तास शोध घेतला.मात्र मृतदेह आढळला नाही.
फोटो सह