Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


वैजापूर-  तालुक्यातील महालगांव  येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. साईनाथ रामचंद्र गायकवाड (४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. महालगव शिवारातील  गट नं. २६५  मधील शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी  आत्महत्या केली.ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.त्यांच्या मृतदेहाचे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास हवालदार गणेश पंडुरे,  गुणवंत थोरात हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई ,वडील,पत्नी,  मुलगा, तीन मुली, भाऊ,  असा परिवार आहे.