प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- वैजापूर पोलीसांनी तीन अट्टल मोटार सायकल चोरट्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.त्यांच्या ताब्यातून वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.तीनही आरोपींना येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.संतोष हरीश्चंद्र फुलारे रा.जरूळ ता.वैजापूर, वाल्मीक चंद्रकांत बागूल रा.साठेनगर निफाड हमू.संवदगाव ता.वैजापूर,पोपट नाथा बागूल रा.लोणी बु ता.वैजापूर असे आरोपीचे नाव आहे.शहरातील मतसागर इलेक्ट्रॉनिक दुकानासमोरून १८ जानेवारी रोजी बबन जयाजी ठोंबरे यांची मोटारसायकल ( एम एच १७ एम२१५५) ही चोरी झाली होती.तसेच उत्तम कारभारी तरटे रा.उंदीरवाडी यांची मोटारसायकल (एम एच १७ सीके ३८५३) २१ नोव्हेंबर रोजी भाजी मंडई मधून चोरी झाली होती.वैजापूर पोलीसांनी तपास करून तिन्ही आरोपींना जेरबंद केले.त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अधिक तपास पोलिस निरीक्षक सम्राट राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय खोकड हे करीत आहेत.