Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोळगाव येथे महिलांसाठीचे कायदेविषयक शिबिर संपन्न



 महेश साळुंके/निफाङ तालुका प्रतिनिधी

कोळगाव येथे श्रीराम शैक्षणिक विकास केंद्र व भ्रष्टाचार अन्याय अत्याचार निर्मुलन समिती आयोजित महिलांसाठीचे कायदेविषयक शिबिर शिबिर संपन्न  झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर यांनी भूषविले.तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती निफाडचे माजी सभापती शिवा सुरासे व महिलांविषयक कायद्याची माहिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ ॲड.रणजित गंगाधर जाधव उपस्थित होते.  

महिला सक्षमीकरनासाठी घरातील सर्व कुटुंबाने महिलेमागे एका दीपस्तंभाप्रमाणे सक्षमपणे उभे राहणे गरजेचे आहे तसेच महिलांनी त्यांना उपलब्ध असलेल्या कायद्यांचा शस्त्र म्हणून दुरुपयोग करू नये तसेच महिलांविषयक कायद्यांची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ॲड.रणजित जाधव यांनी आपल्या व्याख्यानामध्ये केले.

या वेळी कोळगाव ग्रामपंचायतीमध्ये नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य पदी तसेच अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या तालुका उपाध्यक्षपदी शोभा जगताप यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांच्यामार्फत करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष किशोर जाधव,कोळगाव ग्रामपंचायतचे सरपंच,सदस्य,सोसायटीचे चेअरमन,पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते बबलू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.