प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- एका व्यापाऱ्याची दूकान फोडून चोरट्यांनी नऊ लाख रुपये लंपास केले.ही घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील सवंदगाव येथे घडली .सवंदगाव येथील रहिवासी विजय भाऊसाहेब कदम यांची गावातच श्रीराम अॅग्रो सर्वीसेस नावाची दुकान आहे.या दुकानातून ते खते,बी,बियाणे , किटकनाशके व अन्य साहित्य विक्री करतात.तसेच शेतकऱ्यांचा कापूस देखील खरेदी करतात.त्यांच्या दुकान जवळच घराचे काम सध्या सुरू आहे.त्यामुळे ते वस्तीवर कांदा चाळीत राहतात.
मंगळवारी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले.रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकान समोर राहणारे अविनाश सुर्यवंशी यांनी त्यांना फोन करून सांगितले की,तुमच्या दुकानासमोर तोंड बांधलेले दोन व्यक्ती उभ्या आहेत.त्यामुळे कदम हे भावास घेऊन तातडीने दुकानावर आले.त्यावेळी दुकानात जाऊन बघीतले असता.दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला होता.तसेच तीन काउंटरचे देखील लाॅक तुटलेले दिसले.चोरट्यांनी त्यांचे गल्ल्यात ठेवलेले रोख रक्कम नऊ लाख व चार हजार रुपये किंमतीचे चांदीचे नाणे लंपास केले.या प्रकरणी विजय कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.