Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शोरूम फोडून चोरटयांनी दोन मोटार सायकल व एक लॅपटॉप नेल्याची घटना



वैजापूर भारती कदम


वैजापूर शहरातील स्टेशन रोडवरील लखानी हिरो होंडा  शोरूम फोडून चोरटयांनी दोन मोटार सायकल व एक लॅपटॉप   नेल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.विशेष म्हणजे १२ नोव्हेंबर २०२१ रोजी हे शोरूम फोडून चोरट्यांनी तीन मोटारसायकली चोरून नेल्या होत्या.
  जावेद इक्बाल लखानी, रा. औरंगाबाद यांचे स्टेशन रोड वर दुचाकी वाहनांचे शोरूम आहे.  कर्मचाऱ्यांंनी नेहमीप्रमाणे शुक्रवारी शोरूमच्या  शटरला कुलुप लावून शोरूम बंद केले.  शोरूम मध्ये १७ मोटार सायकली होत्या. शनिवारी सकाळी साडे  नऊ वाजेच्या सुमारास कर्मचारी कामावर आले असता त्यांना शोरूमच्या मागील बाजूस असलेला दरवाजा, कंपाउंडचे गेट उघडे दिसले जे की नेहमी लॉक असते. त्यावेळी दोन विना पासिंग मोटार सायकल व लॅपटॉप चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरी गेलेल्या दोन दुचाकी व लॅपटॉप यांची एकूण किंमत एक लाख ५८ हजार ८६ इतकी आहे. याप्रकरणी शोरूमचे व्यवस्थापक सय्यद अन्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.