प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर -तालुक्यातील खंडाळा येथील एक महीला तीन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. अमृता सचिन जाधव (२६) असे बेपत्ता महीलेचे नाव आहे. ती २१ फेब्रुवारी पासून घरातून बेपत्ता झाली आहे. पती सोबत किरकोळ भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली आहे.तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.या प्रकरणी तिच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार अमृता बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस नाईक राम कवडे हे करीत आहेत.