Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आगीत शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान

 



प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

वैजापूर - अचानक लागलेल्या आगीत तालुक्यातील नगीना पिंपळगाव शिवारातील लाडगाव रस्त्यावरील दीड ते दोन एकर उस जळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या आगीत शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतात महावितरणचे रोहीत्र आहे.तेथे विजेचा शॉर्ट सर्किटमुळे या उसाला आग लागल्याचे समजते. स्थानिकांसह वैजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.   
तालुक्यातील नगिना पिंपळगावचे माजी सरपंच बाळकृष्ण गायकवाड यांनी लाडगाव रस्त्यावरील वाडी फाट्याजवळ असलेल्या शेतात उस लावला आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेला अचानक उसाने पेट घेतला. पाहता पाहता या आगीने उग्र रूप धारण केले. यावेळी शेतात असलेल्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतक-यांनी या ठिकाणी धाव घेतली. शेतातील ठिंबकच्या नळ्या व अन्य साहित्य  नागरीकांनी  तेथून काढून घेण्यास मदत केली. यावेळी नगर पालिकेचे अग्निशमन वाहन मागवून आग नियंत्रणात आणली.  नागरिकांनीही  पाणी आणून आग आटोक्यात आणली.या आगीत गायकवाड  दोन एकर उस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.