प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शुक्रवारी तालुक्यातील सटाणा शिवारात पाटाच्या पाण्यात मिळून आला.सोहेल मिरा पठाण (२०) रा.कान्हेगाव ता.श्रीरामपूर असे या मजूर युवकाचे नाव आहे.तो खतांच्या ट्रक्टर वर मजूर म्हणून काम करत होता.रोठी वस्तीजवळ शेणखत खाली केल्यानंतर दोघे यूवक मजूर हातपाय धुण्यासाठी कालव्याजवळ गेले होते .त्यावेळी सोहेल हा पाय घसरून पाण्यात पडला.तसेच दुसरा एक जण बचावला.सोहेल याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी अथक परिश्रमानंतर मिळून आला.वैजापूर पोलीस ठाण्याचे हवालदार किसन गवळी , अग्नीशमन दलाचे पथक व पोहणाऱ्या युवकांनी शोध घेतल्यावर सटाणा शिवारात मृतदेह आढळून आला.या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.