Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वैजापूर तालुक्यातील २० सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

 
 वैजापूर-तालुक्यातील सर्वच विवीध सेवा सहकारी संस्थांची परीस्थिती डबघाईची असून या संस्थांकडे निवडणूका घेण्यासाठी सुद्धा निधी नसल्याने या संस्थांवर प्रशासक नेमण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.संचालक मंडळाची निवडणूकीची मुदत संपून देखील निवडणूक निधी न भरल्यामुळे
तालुक्यातील २० विवीध कार्यकारी सेवा सहकारी संस्था वर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची निवड करण्यात आली आहे.
विवीध सेवा सहकारी संस्थाच्या निवडणुका रखडल्याने त्यांच्याशी संलग्न असलेल्या बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीची मुदत संपून देखील निवडणूक लांबणीवर पडली आहे.गावगाड्याशी निगडीत विविध सेवा सहकारी संस्था तालुक्यात ११५ आहेत.त्या संपूर्ण संस्था कोटी रुपयांनी तोट्यात आहेत.
विविध सेवा सहकारी संस्था वर बाजार समिती,खरेदी विक्री संघ या मोठ्या संस्थांचे भवितव्य अवलंबून आहे.मात्र या संस्था तोट्यात असून कशाबशा केवळ कागदावर सुरू आहेत.अनेक वर्षांपासून या संस्थांकडे निवडणूक घेण्यासाठी  निधी नाही.
तालुक्यातील ११५ पैकी १०७ संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मुदत संपली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.या सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे काम सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून हाती घेतले आहे.या संस्थांची निवडणूक सहा टप्प्यात घेण्यात येणार आहे.सोसायटीचे सर्व सदस्य हे बाजार समितीचे सभासद असतात.त्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क असल्याने खुप महत्व असते.बाजार समितीच्या निवडणूकीची मुदत संपली आहे.परंतू मुदत संपलेल्या विवीध सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका घेऊनच नंतर नव्या सभासदामधून बाजार समितीचे निवडणूक घेण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत.मात्र विवीध कार्यकारी सोसायट्या कडे निवडणूक घेण्यासाठी निधीच नसल्याने सोसायटी सह बाजार समितीचे निवडणूक ही लांबणीवर पडली आहे.बाजार समीतीच्या संचालक मंडळास आतापर्यंत तीन वेळेस सहा  महीने १० दिवसांची मुदत वाढ मिळाली आहे.२२ एप्रिल २०२२ पर्यंत ही मुदत वाढ आहे.
सोसायटीची निवडणूक घेतल्याशिवाय बाजार समितीची देखील निवडणूक घेतली जाणार नाही.त्यामुळे बाजार समीतीवर देखील प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी जिल्हा बॅंकेने सोसायट्यांना २० हजार रुपये निधी देण्याचे ठरवले आहे.उर्वरीत रक्कम संस्थेने भरावयाचे आहे.मात्र ती रक्कम सुद्धा संस्थेकडे नाही.त्यामुळे निवडणूकीसाठी निधी न भरल्यामुळे २० सोसायटीवर प्रशासकाची निवड करण्यात आली आहे.
संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमलेल्या सोसायट्यामध्ये


         1)कोरडगाव      2)नांदूरढोक ,3)मनेगाव 4)संवदगाव  5)हिंगोनी 6)कनकसागज 7) भायगाव 8)भालगाव 9)झोलेगाव 10)मालेगाव 11)बाबतरा 12)मनोली 13)डागपिंपळगाव 14)मनूर 15)वाकला  16)खरज  17)पार्थि 18)साळेगाव 19)जांबरखेडा 20)महालगाव या २० संस्थांचा समावेश आहे.