प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर
वैजापुर व गंगापुर तालुक्यासाठी बुधवारी नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यात बुधवारी सायंकाळी रब्बी हंगामातील आवर्तनसाठी ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग टप्प्या टप्प्याने वाढवून आठशे क्युसेक करणार असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.
हे पाणी शुक्रवारी गंगापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होण्याची शक्यता असुन पायथा ते माथा या नियमानुसार आधी गंगापूर तालुक्यातील गावांना पाण्याचे वितरिकेद्वारे वाटप करण्यात येईल. अशी माहिती नामका विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी दिली.
वैजापुर , गंगापुर व कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मागणी करावी.असे आवाहन करण्यात आले आहे.हे आवर्तन २१ दिवस चालणार आहे.कुणीही अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पाणी उचल करू नये.गैरमार्गाने पाणी उचलल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.