Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गणेश मंदीरात विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        वैजापूर-तालुक्यातील शिवराई येथील गणेश मंदीरात १७ फेब्रुवारी पासून विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची सांगता २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.या निमीत्ताने हभप रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन तसेच जम्मू काश्मीर येथील महामंडलेश्वर स्वामी विश्वात्मानंद सरस्वती महाराज यांचे प्रवचन होणार आहे.तसेच भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

        या गणेश मंदीरात श्री सिद्ध गणेश जयंती महोत्सव ,संन्यास दिक्षा सोहळा,श्रीमद भागवत कथा व संत संमेलनाचे आयोजन स्वामी विष्णूगिरी महाराज यांनी केले आहे.या कार्यक्रमात गुरूशिष्य सनातन परंपरेनुसार ब्रम्हचारी शतानंद यांना संन्यास दिक्षा देण्यात आली आहे.या सांगता कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विष्णू गिरी महाराज यांनी केले आहे.