Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ महाविद्यालय समोर एस टी बसची उभ्या ट्रकला पाठीमागून धडक १६ प्रवासी जखमी



देऊळगाव राजा प्रतिनिधी

देऊळगाव राजा चिखली महामार्गावरील समर्थ कृषी महाविद्यालय समोर उभ्या ट्रकला पाठीमागून बसची धडक 16 प्रवासी जखमी ग्रामीण रुग्णालय देऊळगावराजा येथे जखमी वर उपचार केले पोलीसांनी घट नास्थळी  पंचनामा केला

       एसटी महामंडळाची बस क्र एम एच १४ बी टी १५९७  बस औरंगाबाद येथून चिखली कडे प्रवासी घेऊन जात असताना देऊळगाव राजा चिखली महामार्गावरील समर्थ कृषी महाविद्यालयासमोर रात्रीपासून बंद अवस्थेत उभा असलेला ट्रक ला एसटी बसणे पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे यामध्ये बसलेले 16 प्रवासी जखमी झाले जखमी  प्रवासी यांना108 रुग्णवाहिकेचे डॉ अक्षय गुठे व चालक रामेश्वर दराडे यांनी ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे रुग्णवाहिकेत आणले ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर वैशाली मान्टेडॉक्टर शुभम नागरे डॉक्टर सुधीर मांडे डॉक्टर ज्योती जायभायअधिपरीचारिका सारिका झाडे सविता मोरे प्रियंका राऊत आदींनी जखमींवर प्राथमिक उपचार केले.

     सदर अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी पंचनामा केलामहामार्ग पोलीस हेसुद्धा अपघातस्थळी व ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचले रुग्णांची विचारपूस केलीएसटी महामंडळाचे अधिकारी रुग्णालयात येऊन जखमी रुग्णांची विचारपूस करून पुढील प्रवासासाठी बसची व्यवस्था केली

     जखमींमध्ये विजय कुमार गुप्ता ,सुनंदा गुप्ता, हर्षद गुप्ता 'कविता गुप्ता, गौरागी गुप्ता,सर्व राहणार खामगावह हमीदाबी शेख अब्दुल'शेख सलमान शेख मोमीन रा दे मही शोभा अपर - चिखली ' सखाराम पवार जालना -प्रितम सिंग - नांदेड , सुनिता घारूडकर - जालना , मोतीसिंग उमर - चिखली , शाम सोळूंके - औ.बाद ' अमीनबी - जाफ्राबाद सबीना सईद मोईन - जालना - चालक रविंद्र छबुराव जाधव औरंगाबाद, वाहक शाम पंडीतराव सोळंके औ बाद हे जखमी झाले यांच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमीक उपचार करण्यात आले . पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करत आहे