मनमाड तालुका नांदगाव (प्रतिनिधी भूषण वाघ)
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कार्यकर्ता पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे काम करत असताना समविचारी राजकीय पक्षांना सोबत घेऊन, जनसामान्यांशी संवाद वाढवून पक्ष व संघटना मजबूत करावी. येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकींना सामोरे जाताना या गोष्टींचा फायदा होईल असे मत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. माने यांनी मांडले.
या कार्यक्रमाप्रसंगी BRSP, उत्तर महाराष्ट्राची नवीन कार्यकारणी पक्षाचे प्रदेश सचिव सतीश बनसोडे यांनी घोषित केली.इम्रान खान जिल्हाध्यक्ष धुळे, शेखर रामदास सोनवणे शहराध्यक्ष धुळे, रणजीत प्रभाकर व्यापारी आघाडी धुळे, मसुद अन्सारी अध्यक्ष वाहतूक आघाडी धुळे, समद शेख अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी धुळे, बाजीराव शेजवळ तालुका अध्यक्ष नांदगाव, शिवराम भालेराव तालुका अध्यक्ष सिन्नर, राजू साळवे तालुका अध्यक्ष भुसावळ, वैशाली गायकवाड शहराध्यक्ष मनमाड. नवीन पदाधिकाऱ्यांचे पक्षाचे अध्यक्ष श्री माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.