प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर - तालुक्यातील चांडगाव येथील आरती बाबासाहेब राहाणे या युवतीची टीसीएस कंपनीत निवड झाली आहे.ती येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.तिने २०२१ या वर्षात बीबीए चा अभ्यास क्रम पुर्ण केला आहे.टीसीएस ही टाटा समुहाची आशीया खंडातील सर्वात मोठी कंपनी आहे.या कंपनीत नोकरी मिळणे हे प्रतीष्ठेचे समजले जाते.टीसीएस कंपनी ही देशभरातील विद्यार्थ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करतात.या कथेसाठी देखील आरतीची निवड झाली आहे.या यशाबद्दल आरतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.