Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

न्याहळोदला आता सुटीच्या दिवशीही शाळा

 


विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शाळा व्यतिरिक्त दररोज एक्स्ट्रा क्लासेस व सुट्टीच्या दिवशीही शाळा भरवली जात - दिलीप उपाध्ये



नगर प्रतिनिधी 
       न्याहळोद येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण मंडळ यांचे नूतन विद्यालय न्याहळोद येथे विद्यार्थ्यांचे कोरोना कालखंडात शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शाळा व्यतिरिक्त दररोज एक्स्ट्रा क्लासेस व सुट्टीच्या दिवशीही शाळा भरवली जात आहे.  कोरोना कालखंडात जर कुणाचे नुकसान झाले असेल तर ते विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले असून, यासाठी रविवारी सुद्धा शाळा भरवली जावी असा निर्णय संस्थेचे अध्यक्ष दिलीपजी उपाध्ये यांनी  शिक्षकांची मीटिंग घेवून सूचना केली.
         रविवार म्हटलं की शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची सुट्टी असतेच परंतु येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये या दृष्टिकोनातून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपजी उपाध्ये यांनी उचललेले कौतुकास्पद व अभिमानास्पद पाऊल यामुळे पालक वर्गांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. कोरोना कालखंडात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे त्या नुकसानाची भर काढून निघावी या दृष्टिकोनातून रविवारी देखील पूर्ण वेळ सकाळी ७ ते १२ या वेळात व इतर दिवशी एक्स्ट्रा क्लासेस देखील रोज सकाळी १० ते ११ या वेळात घेण्यात येत आहेत.

    कोरोना काळ सोडला तर विदयार्थ्यांन मध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून दोन तीन वर्षा पासून दररोज नूतन विद्यालयात एक्स्ट्रॉ क्लास देखील सकाळी शाळा सुरू होण्या आधी घेण्यात येत असतात. सुट्टीच्या दिवशीही शाळा भरवली  जात आहे व एक्स्ट्रॉ क्लासेस देखील घेतले जात असल्यामुळे विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने शाळेत जात असून सैनीटायझर व मास लावून नियमित शाळेत येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.    यामुळे पालक वर्गामध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांमधून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना दररोज शाळेत आवर्जून पाठवावे अशी विनंती दिलीपजी उपाध्ये व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षक वर्गानी केली आहे.