प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-येथील न्यायालयातून चोरट्यांनी वकीलाची मोटार सायकल लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली.संदीप रंगनाथ जाधव हे तळेगाव मळे ता.कोपरगाव येथील रहिवासी आहेत.ते वैजापूर न्यायालयात वकीली व्यवसाय करतात.ते गुरूवारी न्यायालयात आले.त्यावेळी त्यांनी आपली मोटार सायकल (एम एच १७ सी जी २५३७) लाॅक करून उभी केली होती.ते न्यायालयातील कामकाज आटोपून बाहेर आले असता त्यांची मोटारसायकल चोरी झाल्याचे लक्षात आले. या मोटारसायकल ची किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे.या प्रकरणी संदीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.