प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- फुलांचे सोरट नावाचा जुगार खेळणाऱ्या तीन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील खंडाळा येथे छापा मारून पोलीसांनी ही कारवाई केली.सचिन विश्वनाथ कदम रा.खंडाळा , तुकाराम संभाजी गायकवाड व संदीप कारभारी गायकवाड रा.भिंगी असे आरोपीचे नाव आहे.
खंडाळा येथे बसस्थानक जवळ जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, पोलीस नाईक रामकृष्ण कवडे आदींनी तेथे छापा मारला.त्यावेळी पोलीसांना पाहुन एक जण पसार झाला.आरोपीच्या ताब्यातून पोलीसांनी रोख रक्कम,दोन मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ६ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी पोलिस नाईक रामकृष्ण कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन कदम, तुकाराम गायकवाड व संदीप गायकवाड या तिन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.