Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बिलोणीत सामाईक बांधावरुन दोन गटात हाणामारी

 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


    शेतातील सामाईक बांधावरील बाभळीचे झाड तोडल्याच्या कारणावरुन दोन गटात लाठ्या काठ्या व कुऱ्हाडीने हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बिलोणी (ता. वैजापूर) शिवारातील गट क्रमांक १४० मध्ये घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन दहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाची अधिक माहिती अशी कि, वैजापूर तालुक्यातील बिलोणी शिवारात गट क्रमांक १४० मध्ये गुलाब कदम व बाळासाहेब उर्फ भानुदास शाहु कदम यांच्या शेतातील सामाईक बांधावर बाभळीचे झाड होते. हे झाड तोडल्याच्या कारणावरुन नाना शाहु कदम, बाळु शाहु कदम, लताबाई बाळू कदम, वेणुबाई शाहु कदम, शाहु फकिरा कदम यांनी गुलाब कोंडिराम कदम व त्यांच्या कुटुंबीयांना लाकडी काठी व कुऱ्हाडीच्या तुंबाने मारहाण केली. या घटनेत गुलाब कदम यांच्यावर हल्ला झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 

        त्यांची भावजय मंगल कदम व वडील कोंडिराम कदम यांनाही मारहाण करुन जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद गुलाब कदम यांनी पोलिसांत दिली. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी दुसऱ्या गटातील गुलाब कदम, अण्णा कदम, कोंडिराम कदम, मंगल कदम व योगिता कदम यांनीही काठी व कुऱ्हाडीने मारहाण करून बाळासाहेब कदम, त्यांचे वडील शाहु कदम यांना जखमी केले. तसेच आई व पत्नीलाही चापटबुक्क्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली अशी विरोधी तक्रार बाळासाहेब कदम यांनी दिली. जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परस्परविरोधी फिर्यादीवरुन एकुण दहा जणांच्या विरोधात शिऊर पोलिस ठाण्यात मारहाण व दंगलीचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सहायक पोऊ उपनिरीक्षक आर. आर. जाधव व पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार हे करत आहेत.