Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विवाहाचे आमीष दाखवून एका युवतीवर गेल्या दोन वर्षांपासून सतत अत्याचार केल्याची घटना



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


    वैजापूर- विवाहाचे आमीष दाखवून एका युवतीवर गेल्या दोन वर्षांपासून सतत अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील साळेगाव येथे शनिवारी उघडकीस आली.या प्रकरणी साळेगाव येथील एका जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.चरण रुपसिंग सुलाने असे आरोपीचे नाव आहे.सदर २१ वर्षीय मुलीस सुलाने याने विवाह करण्याचे आमीष दाखवले.तिचे मोबाईल मध्ये फोटो काढून तिची व तिच्या आई वडीलांची बदनामी करण्याची धमकी देऊन दोन वर्षे अत्याचार केले.तसेच ती गर्भवती राहील्यावर विवाह करायचा आहे.म्हणून गर्भपात देखिल केला.या प्रकरणी सदर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून चरण सुलाने याच्याविरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास फौजदार श्रीराम काळे ( पिंक पथक उपविभाग वैजापूर) हे करीत आहेत.