प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-मोटारसायकल घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणावेत यासाठी विवाहीतेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह तालुक्यातील बेलगाव सासरच्या चार जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.खामगाव ता.येवला येथील रमेश नाना वाघ यांची मुलगी मोनाली (२२) हिचे लग्न बेलगाव येथील अनिल पोपट गुंजाळ याच्याशी झाले होते.लग्नानंतर तिला सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरुवात केली.तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आली.याशिवाय शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.तसेच मोटार सायकल घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये.अशी मागणी तिच्या कडे करण्यात आली.रक्कम न दिल्याने दोन महिन्यांपासून तिला घराबाहेर काढून देण्यात आले.सध्या ती आपल्या दोन मुलांसह माहेरी राहत आहे.या प्रकरणी मोनाली हिने दिलेल्या फिर्यादीवरून अनिल पोपट गुंजाळ,पोपट कुशाबा गुंजाळ, आशाबाई पोपट गुंजाळ व संगिता नितीन शिंदे सर्व रा.बेलगाव या चार जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.