प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- अज्ञात वाहनाने मोटारसायकल ला धडक दिल्याने एक इसम ठार झाला.ही घटना शिवूर खंडाळा दरम्यान रस्त्यावर कोल्ही शिवारात रविवारी घडली.शेख गफ्फार शेख सत्तार (७०) रा.निमगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.ते सेवानिवृत्त हवालदार होते.ते काही कामानिमित्त निमगाव येथून मोटारसायकल वर खंडाळा येथे आले होते.सकाळी ११ वाजता घरून निघाले.मात्र सायंकाळ पर्यंत देखील ते घरी आले नाही.
नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईलवर अनेक काॅल केले.मात्र ते काॅल घेत नव्हते.त्यामुळे नातेवाईकांना संशय आला.त्यांनी लगेच शिवूर पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलिस निरिक्षक यांना माहीती दिली.त्यांनी मोबाईल लोकेशन च्या आधारे शोध घेतला असता कोल्ही शिवारात रस्त्याच्या कडेला झुडूपात त्यांचा मृतदेह आढळून आला.अज्ञात वाहनाच्या धडकेने ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले होते.या अपघाताची शिवूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.