वैजापूर
अॉल इंडिया मजलिस ए इताहुद्दुल मुस्ल्मीन अर्थात एमआयएम चे अध्यक्ष खासदार असोदोद्दिन ओवेसी यांना झेड सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी शुक्रवारी एम आय एमच्या तालुका शाखेतर्फे करण्यात आली. खासदार ओवेसी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तालुकाध्यक्ष अकिल लतीफ कुरेशी व शहराध्यक्ष वसीम जहुर खान यांच्या मार्गदर्शनाखाली येथील उपजिल्हा कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येऊन उपविभागिय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. खासदार ओवेसी यांच्यावर ३ फेब्रुवारी रोजी काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला. यापुर्वीही दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यांमुळे देशातील सुरक्षा यंत्रणा अकार्यक्षम आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या घटनेतील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अॅड रईस शेख, हाफीज शाहरुख, मुसा बशामलुल, अल्ताफ सौदागर, अजहर सौदागर उपस्थित होते.