प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-विहीरीत पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील महालगाव शिवारात शनिवारी उघडकीस आली.भानुदास लक्ष्मण चक्रनारायण (७४) रा.खोकर ता.श्रीरामपूर असे या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे.भानुदास हे मुलगी कांताबाई आंद्रेस आल्हाट यांना भेटण्यासाठी महालगाव येथे आले होते.३ फेब्रुवारी रोजी ते खोकर येथून निघाले .रात्री आठ वाजता ते महालगाव येथे पोहचले.
रस्त्याने पायी जात असताना अंधारात रस्त्याच्या कडेला असलेल्या मच्छिंद्र झिंजूर्डे यांच्या गट नंबर २३० मधील शेतातील विहीरीत ते पडले.दोन दिवसानंतर म्हणजेच शनिवारी त्यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना मिळून आला.या प्रकरणी मच्छिंद्र सूर्यभान झिजुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फोटो सह