प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- वखार आपल्या दारी, वखार महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण अभियान” अंतर्गत येथील वखार महामंडळाच्या केंद्रावर शेेेेतमाल तारण योजनेची शेतकऱ्यांना माहिती मिळावी या करिता एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी विशेष कार्यकारी अधिकारी म ऊ. सुर्यंवशी,भाऊसाहेब टेमगर,विभागीय व्यवस्थापक अंकुश सोनवणे, कुशाग्र मुंगी ,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, बालकृष्णा उंबरकर, साहेबराव औताडे, सागर धनाड, एस के.मोरे, राजदीप दौंड व सहाय्यक साठा अधिक्षक एस के मोरे आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी गोदामांमध्ये २५ % जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे .तसेच वखार महामंडळाने शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी ९ % द.सा.द.शे.व्याज दरामध्ये शेतमाल तारण कर्ज योजना महाराष्ट्र राज्य सहकारी बँके मार्फत राबविली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक भाड्यात ५० % सवलत, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी २५ % सवलत देण्यात येते.
महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या शेतमालाचा १०० % विमा काढला जातो, शेतकऱ्यांनी साठवलेल्या शेतमालावर धुरीकरण ,किडप्रतिबंधक औषध फवारणी केली जाते या साठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन म. ऊ. सुर्यंवशी यांनी केले.