Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

येवला मतदारसंघातील विजेचे प्रश्न लवकरच लागणार मार्गी – निरिक्षक दिलीप खैरे



महेश साळुंके/निफाङ तालुका प्रतिनिधी

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशांनंतर येवला व लासलगाव येथे विजेच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक संपन्न

            लासलगाव,  :-राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित नुकतीच येवला मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशानुसार आज येवला मतदारसंघातील नागरिकांच्या प्रत्यक्ष तक्रारी अधिकाऱ्यांसमवेत जाणून घेतल्या असून त्या लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी तथा येवला विधानसभा मतदारसंघाचे निरिक्षक दिलीप खैरे यांनी दिली आहे.

        येवला मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत निरिक्षक दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली आज येवला तालुक्याची बैठक येवला संपर्क कार्यालयात तर निफाड तालुक्यातील ४२ गावांची बैठक लासलगाव येथे पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांसमवेत येथील स्थानिक नागरिकांच्या विजेच्या समस्या जाणून घेत लवकरच मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. जलदगतीने या सर्व समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचे दिलीप खैरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी अधिक्षक अभियंता श्री.पडळकर, मनमाड विभागाचे कार्यकारी अभियंता महावितरण एस. तडवी, कार्यकारी अभियंता श्री.आव्हाड, उपकार्यकारी अभियंता साबळे मॅडम, उपकार्यकारी अभियंता येवला ग्रामीण एम.डी जाधव, येवला शहर सहाय्यक अभियंता महेश जगताप, उपअभियंता श्री.ढिकले, श्री. सोनवणे,  नाशिक पूर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, येवला उपविभाग क्रमांक २ उपअभियंता उमेश पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अन्सार शेख  यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

        यावेळी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, किसनराव धनगे, भाऊसाहेब भवर, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, पांडुरंग राऊत, नगरसेवक दिपक लोणारी, प्रवीण बनकर, गुणवंत होळकर, सरपंच दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, ललित दरेकर, मंगेश गवळी, उन्मेष डूमरे, उत्तम नागरे, रामभाऊ जगताप, प्रदीप तीपायले, विनोद जोशी, सचिन होळकर, बबन शिंदे, संतोष राजोळे, नारायण पालवे, माऊली घोटेकर, सुनील शेजवळ, हर्षद शेख, मंत्री भुजबळ यांचे विशेष कार्यअधिकारी महेंद्र पवार, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, अडतीस गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, ज्ञानेश्वर शेवाळे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, अकबर शहा, बाबुराव सोमासे, संजय सोमासे,विजय खैरनार, राजेश भांडगे, गोटू मांजरे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, सुभाष गांगुर्डे, सचिन सोनवणे, प्रवीण पहिलवान, विजय जेजुरकर, भाऊसाहेब धनवटे, इस्माईल मोमीन, आत्माराम दरेकर, सोहेल मोमीन, जयंत साळी, विलास गोरे, महेंद्र पुंड, अमजद पठाण, सद्दाम शेख, कौसर बागवान, अवी सालगुडे, शिवम गोरे, अनिल विंचुरकर  यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.