मलकापूर
मलकापूर १४/२/२२ जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यातील शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे . त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील पुलवामा हल्ल्यातील शहीद वीर जवान संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाचं जवळ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीने पुष्पहार व मेणबत्ती प्रज्वलित करीत त्रिवार अभिवादन पर श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे विदर्भ सचिव उल्हास शेगोकार, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश दांडगे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण भगत ,जिल्हा कार्याध्यक्ष एन. के. हिवराळे, विनायक तळेकर, अहिल्याराज संपादिका धनश्री काटीकर,जिल्हा कोषाध्यक्ष करणसिंग शिरसवाल,तालुकाध्यक्ष धीरज वैष्णव , शहराध्यक्ष दीपक इटणारे,रोषण वाकोडे , इंगळे सर,सार्थक इंगळे आधी पत्रकारांनी अभिवादन पर श्रद्धांजली वाहिली आहे.