कंधार कुरुळा/प्रतिनिधी अंगद थोटे
छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला, ते धर्मनिरपेक्ष होते. एकसंघ राज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. परंतु शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खोटा इतिहास लिहिला गेला. आज धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातील परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. बालाजी जाधव यांनी केले. ते दैठाण येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोमारे, मराठा सेवा संघाचे नामदेव कुट्टे होते. व्यासपीठावर धनराज पाटील लुंगारे, बळीराम पा. पवार, संभाजी पा. लाडेकर, नितीन पा. कोकाटे, तिरुपती जाधव, सतीश देवकत्ते, कुरुळा चे उपसरपंच शिवदर्शन चिवडे, संभाजी जाधव, तानाजी वळशिंगे, परशुराम तोरणे, बालाजी गित्ते, रमेश केंद्रे, नागनाथ कदम, गणपत सोनकांबळे, विठ्ठल टिकते, संतोष गित्ते, पवन कदम, बालाजी केंद्रे, माणिक ढवळे, श्रीराम फाजगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी न करता प्रबोधनातून शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्षतेचा विचार घराघरात पोहोचविण्याची गरज आहे आणि सध्या हाच प्रयत्न आहे. म्हणूनच आज जगभरातील ५० देशात शिवजयंती साजरी होत आहे. शिवजयंती हा बहुजन समाजाचा उत्सव झाला आहे. शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला असल्याने नवीन पिढीला त्यांचा खरा इतिहास सांगण्याची गरज आहे असे ते म्हणाले,
आज शिवरायांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जात आहे. लढाई, मुत्सदेगिरी, व्यवस्थापन कौशल्य व रयतेचा विश्वास या बळावर महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. स्वराज्य स्थापन करताना त्यांनी सर्वसामान्य, गरीब जनतेला सोबत घेतले. सैन्यभरती व अधिकारपदाची निवड करताना गुणवत्तेला प्राधान्य दिले. महाराजांनी जात, धर्म व वंश पाहिला नाही . शिवजयंती मंडळ दैठणा च्या माध्यमातून ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी न करता प्रबोधन मेळावे आयोजित करून शिवरायांचा विचार देशभर पोहोचविण्याचे प्रयत्न असल्याचे राम आनकाडे यांनी म्हटले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अ. भा. छावा जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील आणकाडे, राम पाटील आणकाडे, सरपंच नामदेव चोंडे, रामेश्वर आनकाडे, गोविंद आनकाडे, एकनाथ चोंडे, कृष्णा आनकाडे, संभाजी आनकाडे, तुकाराम केंद्रे, चंद्रकांत आनकाडे, किरण चोंडे, संजय देशमुख, जग्गू केंद्रे ,मारोती आणकडे, ज्ञानेश्वर केंद्रे, लक्ष्मण ढवळे दशरथ केंद्रे.छत्रपती युवक मंडळ व समस्त गावकरी मंडळनी परिश्रम घेतले.