प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर. व्यवसाय करण्यासाठी माहेरहुन दोन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत विवाहितेचा छळ करुन घराबाहेर काढल्याची घटना शहरातील फुलेवाडी रोड भागातील संतोषी माता नगरमध्ये घडली. याप्रकरणी सविता पवार (रा. दहेगाव) या महिलेने फिर्याद दिल्यानंतर पतीसह सात जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुनिल अंबादास पवार (पती), अंबादास रामा पवार (सासरा), भामाबाई अंबादास पवार (सासु), राजु अंबादास पवार (दिर), सपना राजु पवार (जाऊ), छाया कैलास शिंदे (नणंद), कैलास चौद्रभान शिंदे (नंदई) सर्व या. वैजापूर अशी आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दहेगाव येथील सविता या महिलेचे २००५ मध्ये शहरातील संतोषीनगर भागात राहणाऱ्या सुनील अंबादास पवार यांच्याशी लग्न झाले. त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत.
लग्नाच्या दहा बारा वर्षे चांगली वागणुक दिल्यानंतर सासरच्या मंडळींनी सविता कडे व्यवसायासाठी माहेरहुन दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. घरची परिस्थिती चांगली नसल्याचे सविताने सांगितल्यानंतर सुनील माने सविताला मारहाण केली. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी तु पैसे आणले नाहीस तर तुला घरात नांदु देणार नाही. सुनीलचे दुसरे लग्न लावुन देऊ असे म्हणुन शारिरीक व मानसिक छळ केला. याबाबत सविताने आईवडीलांना सांगितल्यानंतर आई वडीलांनी समजुत घालुन त्यांना ५० हजार रुपये दिले मात्र काही दिवसांनंतर त्यांनी पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर सुनीलने पत्नीस माहेरी आणुन सोडले. याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली. तारखेच्या वेळी पवार कुटुंबीयांनी आता सूनीलने दुसरे लग्न केले आहे, आम्हाला तुझी गरज नाही असे म्हणून सविताला घेऊन जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे सविताने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन सर्व आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.