तालुका दक्षता समिती अध्यक्षपदी सिरसाट तर महीला मधुन सौ यशोदा सुरेश तिडके सौ रेवती गुलाबराव कणखर यांची सदस्य म्हणून निवड झाली देऊळगावराजा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या शिफारशीवरून राजू सिरसाट व सै यशोदा सुरेश तिडके
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा विभागा मार्फत नुकतेच तालुका दक्षता समितीची घोषणा जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे तत्कालीन तालुकाध्यक्ष राजीव जनार्दन सिरसाट यांची दक्षता समिती तालुकाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. तालुका राष्ट्रवादी च्या अध्यक्षपदी गत पाच वर्षापासून संघटनात्मक दृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करणारे राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजीव जनार्दन सिरसाट यांची तालुका दक्षता समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक • वितरण व्यवस्थे द्वारा वितरीत करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय दक्षता समितीचे गठण करण्यात आले. संघटन कौशल्य अवगत असलेल्या राजीव शिरसाठ यांच्या नेतृत्वातील दक्षता समितीत इतर सदस्य म्हणून सौ रेवती गुलाबराव कणखर मेंडगाव,
सौ यशोदा सुरेश तिडके देऊळगाव राजा, परमेश्वर साहेबराव शिंदे पाडळी शिंदे, धर्मराज विवेक खिल्लारे देऊळगाव मही, व गणेश भानुदास सरोदे सिनगाव जहागीर यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. दक्षता समिती तालुका अध्यक्ष राजू सिरसाट यांच्यासह इतर नवनियुक्त सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.